वेंगुर्लेत युवतीवरील अत्याचाराचा आरोप;

तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

वेंगुर्ले : तालुक्यातील एका गावातील युवतीने दिलेल्या तक्रारीनंतर अत्याचाराच्या आरोपाखाली आदित्य पायनाईक (वय २८) याच्याविरोधात वेंगुर्ले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संबंधित युवती गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाल्यानंतर तिने पोलिसांकडे धाव घेतल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, जुलै महिन्यात दोन वेळा अत्याचार झाल्याचा आरोप युवतीने केला आहे. त्यानंतर पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने तिने डॉक्टरांकडे तपासणी केली. यावेळी ती गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेनंतर युवतीने वेंगुर्ले पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी आदित्य पायनाईक याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेतील कलम ६४(२)(जे), ६४(२)(एम), ७४, ७५(२) आणि ७६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शेखर दाभोलकर या प्रकरणाचा तपास करत आहेत.

error: Content is protected !!