पणदूर : पणदूर येथील श्री देवी सातेरी मंदिरात श्री देवी सातेरी नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित नवरात्रोत्सवाचा भव्य उद्घाटन सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी उपस्थित राहून श्री देवी सातेरी मातेचे दर्शन घेतले व सर्वांच्या सुख, समृद्धी आणि भरभराटीसाठी प्रार्थना केली.
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. ग्रामदेवतेच्या उत्सवात ग्रामस्थ, भाविक आणि मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.
या कार्यक्रमाला महिला जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्या सौ. दीपलक्ष्मी पडते, माजी उपसरपंच श्री. साबाजी म्हसगे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. बाळू साईल, श्री. राजेश टंगसाळी, श्री. सत्यवान साईल, श्री. राजन जाधव, श्री. उत्तम पणदूरकर, श्री. धोंडी जाधव तसेच श्री देवी सातेरी नवरात्रोत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आई श्री देवी सातेरी मातेच्या आशीर्वादाने सर्वांच्या जीवनात सुख, शांती, आरोग्य व समृद्धी नांदो आणि गावाची उत्तरोत्तर प्रगती होवो, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.