युवा उद्योजक संतोष वालावलकर यांच्या पुरस्कृत सहकार्याने ड्रीम स्क्वेअर रेसिडेन्सी व सिद्धिविनायक कॉलनीत नवरात्रोत्सवाची धूम!

११ ते २० ऑक्टोबरदरम्यान धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसह गरबा रासची रंगत.

केतन शिरोडकर /कुडाळ

नवरात्रोत्सव २०२६ चे औचित्य साधून युवा उद्योजक संतोष वालावलकर व कुटुंबीय पुरस्कृत ड्रीम स्क्वेअर रेसिडेन्सी आणि सिद्धिविनायक कॉलनी यांच्या सहकार्याने विविध धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ११ ते २० ऑक्टोबर या कालावधीत बजाज शोरूमच्या मागे, सांगिर्डेवाडी, कुडाळ येथील ड्रीम स्क्वेअर रेसिडेन्सी येथे हा नवरात्रोत्सव भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होत आहे.
नवरात्रोत्सवाची सुरुवात रविवारी सकाळी धार्मिक विधींनी झाली. सकाळी ८ वाजता श्री एकादशमी अभिषेक, कथावाचन आणि गरबा रास या कार्यक्रमांनी उत्सवाचा प्रारंभ झाला. पुढील दिवसांत महिला व लहान मुलांसाठी विविध स्पर्धा, नृत्याविष्कार, फुगडी, गीतांचा कार्यक्रम, जादूचे प्रयोग आणि पारंपरिक गरबा रास अशा भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी नागरिकांना अनुभवता येणार आहे.

असा रंगणार नवरात्रोत्सवाचा कार्यक्रम!

सोमवार, १२ ऑक्टोबर : रात्री ९ वाजता ड्रीम स्क्वेअर रेसिडेन्सी व सिद्धिविनायक कॉलनीतील महिलांचे नृत्य सादरीकरण, त्यानंतर गरबा रास.
मंगळवार, १३ ऑक्टोबर : रात्री ८ वाजता श्री देव जैन महालक्ष्मी फुगडी ग्रुप, वालावल घाडीवाडी यांचा फुगडी कार्यक्रम; रात्री ९.३० वाजता गरबा रास.
बुधवार, १४ ऑक्टोबर : रात्री ८ वाजता लहान मुलांचे रेकॉर्ड डान्स; रात्री ९.३० वाजता गरबा रास.
गुरुवार, १५ ऑक्टोबर : रात्री ८ वाजता मान्यवरांचे स्वागत. रात्री ८.३० वाजता गायक युसुफ आणि गायिका सपना यांच्या हिंदी-मराठी गीतांचा सुरेल कार्यक्रम, लहान मुलांसाठी खेळ तसेच सिंधुकन्या जादूगार पूर्वा यांचा जादूचा खेळ. रात्री १० वाजता गरबा रास.
शुक्रवार, १६ ऑक्टोबर : रात्री ८ वाजता लहान मुले व महिलांसाठी वेशभूषा स्पर्धा आणि ‘पाणी आणि पर्यावरण’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा. रात्री १० वाजता गरबा रास.
शनिवार, १७ ऑक्टोबर : रात्री ८ वाजता लहान मुलांसाठी मनोरंजक खेळ; रात्री ९.३० वाजता गरबा रास.
रविवार, १८ ऑक्टोबर : रात्री ८ वाजता निवेदक युसुफ आवटी यांच्या निवेदनाखाली ‘खेळ पैठणीचा’ हा महिलांसाठी विशेष कार्यक्रम. त्यानंतर गायक युसुफ आणि गायिका सपना यांच्या हिंदी-मराठी गीतांचा सुरेल कार्यक्रम.
सोमवार, १९ ऑक्टोबर : रात्री ९ वाजता गरबा रास.
मंगळवार, २० ऑक्टोबर : विजयादशमीनिमित्त पारंपरिक सोनं वाटपाचा कार्यक्रम आणि रात्री ९ वाजता गरबा रास.
महिला, बालकलाकारांच्या कलागुणांना मिळणार व्यासपीठ
धार्मिक परंपरा जपत सांस्कृतिक कलागुणांना वाव देणे, महिला व लहान मुलांना आपले कौशल्य सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच रहिवाशांमध्ये स्नेहभाव आणि एकोपा वाढविण्याच्या उद्देशाने या नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या उत्सवातील सर्व कार्यक्रमांना सभासद, रहिवासी आणि सहकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवरात्रोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!