सिंधुदर्पणचे प्रतिनिधी केतन शिरोडकर यांचा प्रांताधिकारी सौ. ऐश्वर्या काळूशे यांच्या हस्ते सत्कार

सामाजिक बांधिलकी जपत निर्भीड पत्रकारिता करणारे सिंधु दर्पण न्यूजचे पत्रकार केतन शिरोडकर यांचा सत्कार उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी सौ. ऐश्वर्या काळूशे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित एका कार्यक्रमात हा सत्कार सोहळा पार पडला. पुष्पगुच्छ देऊन सौ. काळूशे मॅडम यांनी केतन शिरोडकर यांचा गौरव केला.

यावेळी तहसीलदार सचिन पाटील, निवासी नायब तहसीलदार श्री. अमरसिंह जाधव, तलाठी जितेंद्र खताडे, जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक वालावकर सर, अंगणवाडी सेविका सुरेखा पाटकर बाई, पोलीस पाटील शंकर सातार्डेकर यांच्यासह शिक्षक वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशासनाच्या विविध उपक्रमांना प्रसिद्धी देण्याबरोबरच सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केतन शिरोडकर करत असल्याबद्दल यावेळी मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले.

या सत्काराबद्दल केतन शिरोडकर यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.

error: Content is protected !!