बांबूळी म्होळंबवाडी रस्त्यासाठी ४ लाख रुपये मंजूर

कुडाळ : कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून बांबूळी म्होळंबवाडी रस्त्यासाठी ४ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, सभापती मिलिंद नाईक, तालुकाप्रमुख दीपक नारकर, विनायक राणे यांचे सहकार्य लाभले. या कामासाठी विभागप्रमुख नागेश परब, शाखाप्रमुख संदीप परब व सिद्धेश परब यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता प्रतीक्षेत होता. या रस्त्यामुळे ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर होणार असून समाधान व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!