नांदरुख येथे ग्रामस्थांच्या श्रमदानातून जलसंधारणाचे काम

नांदरुख : ग्रामपंचायत नांदरुख, कुर्लेभाटले वाडी ग्रामस्थ आणि प्रेरणा महिला ग्रामसंघ यांच्या संयुक्त सहभागातून जलसंधारणाचे काम श्रमदानातून करण्यात आले. या उपक्रमात ग्रामस्थ, महिला आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरवणे, पाण्याची उपलब्धता वाढवणे आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करणे या उद्देशाने हे काम करण्यात आले. गावातील नागरिकांनी एकत्र येऊन श्रमदान केल्यामुळे लोकसहभागातून जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित झाले.
या वेळी संदीप कांबळी, संतोष पाटकर, सतीश कांबळी, दिलीप भगत, विश्वास भगत, भरत तोंडवळकर, सुहास राणे, अभिषेक भगत, रवींद्र भगत, शामसुंदर कांबळी, संतोष चव्हाण, अक्षता पाटकर, भक्ती तोंडवळकर, गीता पाटकर, साक्षी कांबळी, सायली पाटकर, सुश्रिया चव्हाण, कविता चव्हाण, श्रेया चव्हाण आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
तसेच प्रेरणा महिला ग्रामसंघाच्या सी.आर.पी. सलोनी पाटकर, ग्रामपंचायत अधिकारी गणेश नलावडे, ग्रामपंचायत कर्मचारी घनश्याम परब आणि ग्रामपंचायत सदस्य समीर पाटकर यांनीही या उपक्रमात सहभाग घेतला.

गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांनी एकजुटीने पुढाकार घेऊन केलेले हे श्रमदान कौतुकास्पद असून, अशा उपक्रमांमुळे जलसंधारणाबाबत जनजागृती होण्यास मदत होणार आहे. लोकसहभागातून जलसंधारण, श्रमदानातून गावाची समृद्धीकडे वाटचाल!

error: Content is protected !!