पिंगुळी धुरीटेंबनगर येथे सुभाष धामणेकर (पाटील) यांच्या गॅरेजनजीक तब्बल ९ फूट लांबीचा अजगर आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. अजगर दिसताच ग्रामस्थांनी तातडीने सर्पमित्रांशी संपर्क साधला. माहिती मिळताच पिंगुळी येथील भजनी बुवा तुळशीदास नाईक आणि सर्पमित्र प्रसन्न गंगावणे यांनी घटनास्थळी पोहोचत मोठ्या शिताफीने अजगराला सुरक्षितपणे पकडले. त्यानंतर अजगराला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घेत त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात आले.
अजगराला सुरक्षितपणे पकडून जंगलात सोडल्यामुळे संभाव्य धोका टळला असून, सर्पमित्रांच्या तत्परतेचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.
यावेळी सुभाष धामणेकर (पाटील), महेंद्र धुरी, मिलिंद धुरी, दामू धुरी, विनय येरम, चैतन्य वारंग, जयवंत वारंग, पुरुषोत्तम धुरी, रजत बाबडी, भरत दि. धुरी, तुषार दि. धुरी, निलेश धुरी, अनंत धुरी, संतोष धुरी, निरंजन धुरी यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.