योगिता कानडे/कुडाळ : महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा. ना. दादाजी भुसे यांनी नुकताच ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा महत्त्वपूर्ण दौरा केला. या दौऱ्यादरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक विकास, विद्यार्थ्यांच्या समस्या आणि शिक्षण क्षेत्रातील विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
दौऱ्याची सुरुवात कुडाळ एमआयडीसी येथील शासकीय विश्रामगृहावर झाली. यावेळी शिवसेनेच्या वतीने मंत्री दादाजी भुसे यांचे पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले. या स्वागताप्रसंगी ओबीसी महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष प्रा. डॉ. श्रीधर पेडणेकर, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिवसेना सचिव दादा साईल, आणि जिल्हा प्रवक्ता रत्नाकर जोशी यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या दौऱ्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक विकासाला अधिक गती मिळून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पावले उचलली जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. ‘चला शाळेत जाऊया’ या अभियानाच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रसार करणे आणि विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल बनवण्यासाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.


Subscribe








