नेरूर / कुडाळ : पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेतून जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर यांच्या संकल्पनेतून नेरूर येथे वनराई बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
या बंधाऱ्यामुळे नेरूर ख्रिश्चन वाडी, कलमेवाडी आणि माणकादेवी या वाडीतील शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना मोठा फायदा होणार आहे. पावसाचे पाणी योग्य रीतीने साठावे आणि भूगर्भातील पाणी पातळी वाढावी यासाठी या बंधाऱ्यात प्लास्टिकचा वापर करण्यात आला आहे. ग्रामस्थानी श्रमदान करून या उपक्रमात मोलाचा सहभाग घेतला.
नेरूर पंचक्रोशीत 50 बंधारे बांधणार
नेरूर पंचक्रोशीत येत्या काळात 50 वनराई बंधारे बांधण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी सांगितले. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तर सामाजिक कार्यकर्ते गोटू नाईक यांनी सांगितले की ग्रामस्थांच्या मागणीनुसार ज्या ज्या ठिकाणी बंधारा आवश्यक आहे त्या ठिकाणी आम्ही श्रमदान करून पाणी साठा करू व पाणी टंचाई वर मात करण्याचा प्रयत्न करणार.
यावेळी माजी सरपंच शेखर गावडे, सामाजिक कार्यकर्ते गोटु नाईक, पीटर फर्नांडिस,मंगेश रेवणकर, दिनेश पेडणेकर, देऊ नाईक, आतुलो फर्नांडिस, सदानंद म्हापणकर, विजय दाभोलकर, अमर कदम, तलाठी भाऊ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.




Subscribe








