३ वर्षांपासून नजरेआड असलेला आरोपी अखेर ताब्यात

स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई

मागील ३ वर्षांपासून होता अस्तित्व लपवून फिरत

कणकवली : गेल्या ३ वर्षांपासून नजरेआड असलेल्या आरोपीस अखेर शिताफीने ताब्यात घेण्यात आले आहे. लीलाधर मोडाराम सुथार (३९, मूळ रा. पिंपसार नागोर, राजस्थान)असे त्याचे नाव आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या सिंधुदुर्ग शाखेने ही कारवाई केली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कणकवली येथील सतीश विजय नाईक यांच्या घरी सदर व्यक्ती वर्षभर काम करत होती. सतीश नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सदर व्यक्तीने नाईक यांच्या पत्नीचे ३.७ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व १ लाख रुपये किमतीचे लाकडी प्लायवूड चोरून नेले होते. यानंतर हा आरोपी गोवा, जयपूर, उदयपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी ३ वर्षांपासून अस्तित्व लपवून फिरत होता.

सदर आरोपी ताडदेव मुंबई परिसरात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषणला मिळाली. त्यानुसार दिनांक ६ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ व पथक यांनी आज दिनांक आराध्या आवान बिल्डिंगजवळ,भाटिया हॉस्पिटलच्या मागे,ताडदेव मुंबई येथे सापळा रचत सदर आरोपीस शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाहीकरिता कणकवली पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

  सदरची कारवाई मा.श्री.मोहन दहिकर, पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग, मा. कु. नयोमी साटम, अप्पर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्या सुचनेनुसार पोलीस निरीक्षक श्री.प्रवीण कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ , सहाय्यक  पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, HC जॅकसन घोन्सालविस, PC अमर कांडर तसेच HC पांडुरंग पांढरे(कणकवली पोलिस ठाणे) यांच्या पथकाने केली.
error: Content is protected !!