पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांचे विशेष प्रयत्न
मराठा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महासंघ सिंधुदुर्ग संघटनेचा यशस्वी पाठपुरावा
पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे साहेब यांच्या प्रयत्नातून तसेच मराठा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महासंघ सिंधुदुर्ग संघटनेच्या पाठपुराव्यामुळे,मा.उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून गेली 15 वर्षे विनवेतन काम करणाऱ्या कनिष्ठ लिपिक यांना अखेर मान्यता मिळाली.
गेली 15 वर्षे शिक्षकेतर कर्मचारी लिपिक भरती प्रक्रिया बंद होती. दिनांक 4 एप्रिल 2025 च्या शासन निर्णयानुसार भरती प्रक्रियेस मान्यता मिळाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही संस्थांनी कनिष्ठ लिपिक भरती प्रक्रिया राबवून माध्यमिक शिक्षण विभाग सिंधुदुर्ग यांच्याकडे मान्यतेस्तव प्रस्ताव सादर केले होते. परंतु 28 मे 2025 च्या संचालकांच्या आदेशाने सदरच्या प्रस्तावांना मान्यता देण्यासंदर्भात स्थगिती देण्यात आली होती. त्या अनुषंगाने मराठा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महासंघ सिंधुदुर्ग च्या वतीने पालकमंत्री नितेश राणे साहेब,आमदार निलेश राणे साहेब यांच्याशी पाठपुरावा करून सदरचा स्थगितीचा आदेश रद्द करण्याबाबतचे शासन स्तरावर प्रयत्न करण्यात आले तसेच मा.उच्च न्यायालयाच्या आदेशाला अधीन राहून लिपिक मान्यतेचा प्रश्न निकाली निघाला. पालकमंत्री श्री नितेश राणे साहेब,आमदार श्री निलेश राणे साहेब,माजी आमदार अजितराव गोगटे साहेब,शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब ,जिल्हा परिषद अध्यक्ष श्री प्रमोद कामत,उपाध्यक्ष श्री दादा साईल ,शिक्षण सभापती श्री प्रितेश राऊळ गटनेता श्री केशव नारकर,मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री वामन तर्फे सर यांच्या सहकार्यातून सदरच्या मान्यता आज पालकमंत्री साहेब यांच्या हस्ते वितरित करण्यात आल्या..मान्यता मिळाल्यानंतर गेली 15 वर्षे विनवेतन काम करणाऱ्या कनिष्ठ लिपिक यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलेले पाहायला मिळाले.
मान्यता मिळविण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधी,अधिकारी,संघटना पदाधिकारी यांचे मराठा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महासंघ सिंधुदुर्ग संघटना अध्यक्ष दिनेश म्हाडगुत सर यांनी आभार मानले.
1
/
117
Kudal | बैलांच्या अंगावर जखमा, लोकांची गर्दी... पिंगुळीत सुरू असलेल्या झुंजीवर पोलिसांचा छापा!
बैलांच्या अंगावर जखमा, लोकांची गर्दी... पिंगुळीत सुरू असलेल्या बेकायदेशीर झुंजीवर पोलिसांचा छापा!
kudal | योगेश मोबाईल शॉपी कुडाळ - मोबाईलसोबत थार, स्पोर्ट्स बाईक व ₹ 10 लाख जिंकण्याची संधी #kudal
Kudal | ग्रामस्थांच्या मागण्या मान्य होईपर्यंत बिल्डरला काम करू देणार नाही- निलेश राणे | Nilesh Rane
Kudal | तो बिल्डर कोण लागून गेला त्याला तुमच्यासाठी गुडघ्यावर आणू - आ. निलेश राणे | Nilesh Rane
Nilesh Rane | मतदारसंघासाठी अख्ख विधिमंडळ अंगावर घेऊ शकतो | kudal #nileshrane
kudal | जर लोकांना प्रकल्प नको असेल तर गेटवर तुमच्या पुढे राहणारा निलेश राणे असेल | Nilesh Rane
Kudal | जयंत पाटील यांनी काजू बोर्डाचे ३५ कोटी खाल्ले - आ. निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane
Kudal Pinguli | राष्ट्रवादी श. प. गटाचे नेते आ. जयंत पाटील यांची पत्रकार परिषद | Jayant Patil
ठाकर आदिवासी कला आंगण येथे पिंगुळी कला महोत्सवाचे आयोजन
Kudal | पाझर तलावाच्या रक्षणासाठी पर्यावरणप्रेमी एकवटले #kudal
Ratnagiri | रत्नागिरीत 'राष्ट्र चिंतन बैठक' यशस्वी संपन्न #ratnagiri
1
/
117


Subscribe








