निरुखे सरपंच कीर्तिकुमार तेरसे यांनी मानले आ. निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार
कुडाळ : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून निरुखे गावासाठी स्वतंत्र तलाठी कार्यालय मंजूर करण्यात आले असून निरुखे सरपंच कीर्तिकुमार तेरसे यांनी आमदार निलेश राणे यांच्यासह पालकमंत्री नितेश राणे व खासदार नारायण राणे यांचे आभार मानले.
निरुखे गावासाठी स्वतंत्र तलाठी कार्यालय नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत होती. तसेच ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. याबाबत आमदार निलेश राणे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ पाठपुरावा करून निरुखे गावासाठी स्वतंत्र तलाठी कार्यालय मंजूर करून दिले. यासाठी पालकमंत्री नितेश राणे व खासदार नारायण राणे यांचे देखील सहकार्य लाभले. यामुळे ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार असून निरुखे सरपंच कीर्तिकुमार तेरसे तसेच उपसरपंच व सदस्यांनी आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे व खासदार नारायण राणे यांचे आभार मानले.