पडवे- माजगाव येथील तरुणाची गळफास घेत आत्महत्या

बांदा : पडवे- माजगाव (धनगरवाडी) येथील एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना काल घडली. लक्ष्मीकांत शिंत्री (वय ३३) असे मृताचे नाव आहे. त्याने बेरोजगारीला कंटाळून हा प्रकार केला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत बांदा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळताच येथील पोलिस पाटील यांनी तात्काळ याची खबर बांदा पोलीस ठाण्याला दिली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे, उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे, सहाय्यक उपनिरीक्षक श्री कोळेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मीकांत गेल्या काही काळापासून बेरोजगार होता. कामधंदा नसल्याने तो मानसिक तणावाखाली गेला होता. या तणावातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आज सकाळी आणण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी कृत्तीका शिंत्री आहे.

error: Content is protected !!