Category राजकीय

पालकमंत्री नितेश राणे शनिवार २१ मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

कणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शनिवार २१ मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. जनता,कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी घेणार आहेत.

कुडाळ मालवण चे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उमेद अंतर्गत चालू केलेल्या स्वराज उत्पादक गटाचा मोठ्या उत्साहात शुभारंभ

कुडाळ : चेंदवण येथील स्वराज उत्पादक गट प्रभागातील होतकरू महिलांसाठी प्रेरणादायी असून अध्यक्ष सौ रश्मी देवेंद्र नाईक यांचे कार्याला सलाम असे गौरवोद्गार प्रभाग समन्वयक सौ. प्रिया धर्ने यांनी चेंदवण माऊली मंदीर जवळ स्वराज उत्पादक गट इमारतीचा शुभारंभ प्रसंगी काढले. यावेळी…

नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या माध्यमातून शहरातील सर्व १४ अंगणवाड्यांना वाॅटर प्युरिफायर भेट देण्यात

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम कुडाळ : आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या माध्यमातून शहरातील सर्व १४ अंगणवाड्यांना वाॅटर प्युरिफायर भेट देण्यात आले. नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या संकल्पनेतून हा समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात…

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शासन निधीची लूटमार सुरूच..!

मेडिकल कॉलेजमध्ये भ्रष्ट कर्मचाऱ्यांच्या टोळीकडून इमारतींच्या भाडेपट्टीच्या नावाखाली निधीवर डल्ला..! डीनची भूमिका संशयास्पद.? सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडेंचा सणसणाटी आरोप सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भ्रष्टाचाराचे जणू कुरणचं बनले असून अधिकारी कर्मचारी सेवा पुरवठादारांशी संगतमत करून मोठया प्रमाणावर शासन निधीवर डल्ला मारत…

जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी यांचे नाव निश्चित

सिंधुदुर्ग : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी प्रमोद कामत यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून हाती आली आहे. जिल्हा परिषद निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली होती. आज अखेर बांदा जिल्हा परिषद सदस्य प्रमोद…

कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या कारवाईनंतर घनकचरा प्रकल्प स्वच्छ

कणकवली : नगरपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील अस्वच्छतेबाबत नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केलेल्या तातडीच्या कारवाईचा परिणाम सकारात्मक दिसू लागला आहे. अवघ्या चार दिवसांपूर्वी प्रकल्पाची पाहणी करताना साचलेला कचरा आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन न होणे पाहून पारकर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना धारेवर…

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना पावशी विभागाच्या वतीने विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे जिल्हा परिषद सदस्य दादा साईल यांचे आवाहन…

यानिमित्ताने महारक्तदान शिबिर तसेच पावशी विभागातील सर्व गावातील मंदिरामध्ये अभिषेक आणि विशेष पूजेचे होणार आयोजन.. कुडाळ : आमदार निलेशजी राणे साहेब १७ मार्च रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त पावशी विभागाच्या वतीने विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि क्रीडा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.…

गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत झाला नाही तर मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे ठिय्या आंदोलन

नागरिकांना गॅस सिलेंडर मिळत नसल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक मा.आ.वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ तहसील कार्यालयात धडक देत दिला इशारा “देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, मिळत नाही सिलेंडर” ची केली घोषणाबाजी

एआय’ तंत्रज्ञानाच्या मदतीने गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवणार– मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणे

वर्षभरात मत्स्य उत्पादनात ४७ टक्क्यांची वाढ मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेसह २८ नवीन योजना सुरू करण्यात येत आहेत मुंबई : राज्यात गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात आला असून तलावांचे मॅपिंग, उत्पादनाची अचूक माहिती संकलन आणि…

सिंधुदुर्ग माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप

विधान परिषदेत आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मांडली लक्षवेधी कविता शिंपी यांच्या निलंबनाची केली मागणी शिक्षणमंत्री दादा भूसे यांचे चौकशीचे आदेश जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी समितीतर्फे चौकशी करून १५ मार्च पर्यंत देणार अहवाल- दादा भूसे सिंधुदुर्गच्या माध्यमिक शिक्षण विभागात एकच खळबळ सिंधुदुर्ग…

error: Content is protected !!