वैभववाडी प्रतिनिधी: आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील महिला विकास कक्ष व रोटरी क्लब वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १३ डिसेंबर २०२४ रोजी अस्मिता उपक्रमांतर्गत मासिक पाळी व्यवस्थापन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. मनीषा टक्के व श्रीम. जोत्स्ना पाटील (सी. एच. ओ.) यांनी विद्यार्थिनींना मासिक पाळी दरम्यानची स्वच्छता राखण्याचे महत्व,आहार आणि त्या संदर्भातील गैरसमज व समस्या दूर करण्याबाबत मार्गदर्शन केले.या कार्यक्रमात रोटरी क्लब वैभववाडीच्या वतीने विद्यार्थिनीना सॅनेटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब वैभववाडीचे अध्यक्ष प्रशांत गुळेकर, सदस्य श्रीम. संजना रावराणे व श्रीम. स्नेहल खांबल, आरोग्य सेविका श्रीम. जांभवडेकर, प्रभारी प्राचार्य डॉ. एन. व्ही. गवळी, अधीक्षक संजय रावराणे, महिला विकास कक्षाचे सर्व सदस्य व विद्यार्थिनी उपस्थित होते.या कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन प्रा. डॉ. व्ही. सी. काकडे तर आभार प्रदर्शन प्रा.एस.एस. पाटील यांनी केले.

आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न
1
/
111
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
1
/
111

Subscribe










