कुडाळ : आंबडपाल येथील जागृत श्री भद्रकाली मंदिरात ४० भाविकांच्या सहभागातून नवनाथ ग्रंथाच्या ४० अध्यायांचे सामुदायिक पारायण भक्तिभाव आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या धार्मिक उपक्रमासाठी विविध गावांमधून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. कणकवली, कसाल, आंबर्ड, ओरोस, पावशी, तुळसुली, आंबडपाल, कुडाळ, पिंगुळी, वाडीवरवडे, मठ, वजराठ, सावंतवाडी, ओटवणे आदी गावांतील भाविकांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
कार्यक्रमाची सुरुवात सर्व पारायणकर्ते व उपस्थित भाविकांनी एकत्रितपणे ‘ऐं र्हीं क्लीं चामुण्डायै विच्चे’ या मंत्राचा जप करून केली. त्यानंतर श्री भद्रकाली देवीचा विधिवत अभिषेक करण्यात आला. अभिषेकानंतर नवनाथ ग्रंथाच्या सामुदायिक पारायणाला सुरुवात झाली.
या वेळी सहभागी झालेल्या ४० भाविकांनी प्रत्येकी एक अध्याय याप्रमाणे नवनाथ ग्रंथाचे ४० अध्याय एकाच वेळी वाचून पारायण पूर्ण केले. पारायणादरम्यान ‘अलख निरंजन’ तसेच ‘जय भद्रकाली’च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला. पारायण पूर्ण झाल्यानंतर देवीची आरती करण्यात आली.

आंबडपाल भद्रकाली मंदिरात ४० भाविकांचे सामुदायिक नवनाथ पारायण उत्साहात संपन्न.
1
/
111
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
1
/
111

Subscribe










