जिल्हाधिकारी कार्यालयात जयंती उत्साहात साजरी; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी : हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, पराक्रमी योद्धे आणि धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनकार्याविषयी मनोगत व्यक्त केले. त्यांनी संभाजी महाराजांचा संघर्षमय जीवनपट उलगडून सांगत, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही स्वराज्य आणि धर्मरक्षणासाठी त्यांनी दिलेला लढा प्रेरणादायी असल्याचे नमूद केले.
संभाजी महाराज हे केवळ शूर योद्धे नव्हते, तर विद्वान, अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेले राजे होते. त्यांनी आपल्या पराक्रम, राष्ट्रनिष्ठा आणि स्वाभिमानाच्या बळावर साम्राज्याची धुरा समर्थपणे सांभाळली. संकटांसमोर कधीही न झुकणाऱ्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून तरुणांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले. तसेच आपण संभाजी महाराजांचे धैर्य, कर्तव्यनिष्ठा, राष्ट्रप्रेम आणि स्वाभिमान यांचे आचरण आपल्या जीवनात करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. समाज आणि राष्ट्रहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा त्यांच्या जीवनातून मिळते, असेही त्या म्हणाल्या.
या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी आरती देसाई, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी धर्मवीर संभाजी महाराजांना अभिवादन केले.
1
/
112
नाईट लाईफ गँगचा प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार #niteshrane #adityathackeray
अमित ठाकरेंना पराभूत करून निवडून आलेल्या उबाठा आमदारावर मनसे प्रश्न विचारणार का ? #niteshrane
पालकमंत्री नितेश राणेंवर माजी आमदार वैभव नाईक यांचे टीकास्त्र | vaibhav naik | Nitesh Rane
ठाकरे बंधू तुकडे तुकडे गँगचे सदस्य आहेत का? | Nitesh Rane #niteshrane #uddhavthackeray #rajthackeray
Nitesh Rane | नितेश राणेंचा आक्रमक पवित्रा; विरोधकांवर जोरदार हल्लाबोल #niteshrane
Nitesh Rane | ज्याला आपल्या देशाचे तुकडे करायचे आहेत त्याच्या समर्थनाचे मोर्चे निघतात... #niteshrane
kudal | कुडाळच्या छत्रपती शिवाजी पार्कमध्ये इलेक्ट्रिक बाईक चोरीला #kudal #theft
कणकवली मधील संभाव्य पाणी टंचाई बाबत समीर नलावडे यांची पत्रकार परिषद*काय म्हणाले नलावडे सविस्तर पहा
kudal | योगेश मोबाईल शॉपी मध्ये मोबाईल घ्या आणि मिळवा थार जिंकण्याची संधी #mobileoffer #mobile
kudal | पुढच्या वर्षीपर्यंत आमच्या निलेश साहेबांका मंत्रिपद मिळांदेत रे महाराजा... | Nilesh Rane
Kudal | माझा भाऊ मंत्री म्हणजे मीच मंत्री | Nilesh Rane #nileshrane
ओंकार हत्तीवर फेकली पेटती मशाल ? #omkarhatti #sawantwadi
1
/
112


Subscribe










